CM Jagan Reddy : माजी CM जगन रेड्डी यांचे 27.5 कोटींचे शेअर्स जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांचे २७.५ कोटी रुपयांचे शेअर्स तात्पुरते जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंगच्या १४ वर्षे जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये ‘क्विड प्रो क्वो’ (काहीतरी मिळवण्याच्या बदल्यात काहीतरी देणे) गुंतवणुकीचे आरोप आहेत.