CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उद्घाटन करत उपस्थितांना संबोधित केले.