CM Eknath Shinde : ‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’ सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही निशाणा
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.