CM Baghel : माजी सीएम बघेल यांच्यावर ईडी कारवाई; मद्य घोटाळ्याचा तपास सुरू
छत्तीसगडमधील चर्चित २,१६१ कोटींच्या मद्य घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. लखमाला अटक केल्यानंतर ५३ दिवसांनी ईडीने सोमवारी बघेल आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या १४ ठिकाणांवर छापे मारले. सकाळी ७ वाजता तपास सुरू झाला आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहिला. सर्व ठिकाणाहून रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.