CM Atishi : पीएम मोदींच्या अमेरिका भेटीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय; CM आतिशी यांचा राजीनामा
दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव फायनल केले जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. खरंतर, पंतप्रधान मोदी फ्रान्स-अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा त्यांच्या दौऱ्यानंतरच होईल. यामध्ये भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.