Pune Elections : पुण्यात तुतारीचे उमेदवार घड्याळीवर लढणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे.