Nepal : नेपाळमध्ये हिमस्खलन, 7 गिर्यारोहकांचा मृत्यू; 5,630 मीटर उंच शिखरावर अपघात; बेपत्ता लोकांचा शोध सुरू
सोमवारी ईशान्य नेपाळमधील यालुंग री शिखरावर हिमस्खलन झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ५,६३० मीटर उंचीच्या शिखराच्या बेस कॅम्पवर हिमस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर चार जण बेपत्ता आहेत.