Waqf सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले; सबळ पुरावा नसताना हस्तक्षेपाला नकार!!
Waqf सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्यांना आज सुप्रीम कोर्टाने फटकारले. संसदेला कुठलाही कायदा संमत करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामध्ये घटनात्मक उल्लंघन झाले, याचे सबळ पुरावे समोर आणल्याशिवाय सुप्रीम कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.