CJI Chandrachud : एक देश-एक निवडणूक संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन नाही; माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन
भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड म्हणाले, ‘लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे हे संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन नाही.’ तथापि, त्यांनी प्रस्तावित विधेयकात निवडणूक आयोगाला (ECI) दिलेल्या अधिकारांवर चिंता व्यक्त केली आहे.