CJI B.R. Gawai : सरन्यायाधीश म्हणाले- न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकारांचा वापर विनम्रता-जबाबदारीने करावा, न्यायाधीश-वकील ही एकाच रथाची दोन चाके
सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी शनिवारी सांगितले की, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकाराचा वापर नम्रतेने आणि जबाबदारीने करावा.दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) २०२५ च्या १० व्या अखिल भारतीय परिषदेत सरन्यायाधीश बोलत होते, ज्यामध्ये देशभरातील न्यायाधीश आणि न्यायाधिकरण सदस्य उपस्थित होते. सरन्यायाधीश म्हणाले, आपल्याकडे प्रचंड शक्ती आहे, परंतु तिचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्यासमोर येणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांना विश्वास आहे की त्यांना न्याय मिळेल, म्हणून आपले निर्णय निष्पक्ष असले पाहिजेत.