Rajya Sabha : CISF कमांडोंवरून राज्यसभेत गदारोळ; खरगे म्हणाले- निषेध करण्याचा अधिकार, नड्डा म्हणाले- ही अलोकतांत्रिक पद्धत
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या १२ व्या दिवशीही बिहार मतदार यादी पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधकांचा निषेध सुरूच आहे. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ सुरू आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. बिहार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) वर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षाचे खासदार करत आहेत.