Nicolas Maduro : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांची न्यूयॉर्क कोर्टात हजेरी; मादुरो म्हणाले- मी सुसंस्कृत व्यक्ती, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे; पुढील सुनावणी 17 मार्च रोजी
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्क न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी न्यायालयात स्वतःवरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. मादुरो म्हणाले की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. ते एक सुसंस्कृत व्यक्ती आहेत. आजची सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होईल.