Zubeen Garg : गायक जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात 12 डिसेंबर रोजी आरोपपत्र; आतापर्यंत सात जणांना अटक
आसाम पोलिस गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी 12 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल करेल. प्रकरणाचा तपास करणारे सीआयडीचे विशेष डीजी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी शनिवारी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 300 हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे.