Churachandpur : मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये 17 एप्रिलपर्यंत संचारबंदी; वादग्रस्त जागेवर झोमी आणि हमार जमातींनी फडकवले झेंडे, संघर्षात वाढ
दोन जमातींमधील वादामुळे मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात बुधवारी १७ एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला. मंगळवारी वादग्रस्त जागेवर आपापल्या समुदायाचे झेंडे फडकवण्यावरून झोमी आणि हमार जमातींमध्ये तणाव निर्माण झाला होता. वादग्रस्त जागा व्ही मुनहोइह आणि रेंगकाई गावांमध्ये आहे.