Election Commission : महाविकास आघाडी – निवडणूक आयोगात आज पुन्हा बैठक; विरोधकांच्या मागण्यांवर आयोग सकारात्मक
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.