Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या- ओ, बारामतीच्या मोठ्ठ्या ताई, तुमच्या तर दिव्याखालीच अंधार हो!!
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे खडसे कुटुंबाची कोंडी झाली असून, विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे.