Ravi Rana : बच्चू कडू हे पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा आरोप
प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू हे शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, असा दावा माजी खासदार नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हेच त्यांचे काम आहे. हा एक नंबर चिल्लर माणूस असून, त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा यांच्या या टीकेमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.