Chief Officer Sagar Gupta : भारताने युक्रेनच्या राजदूताला बोलावले; ब्लॅक सीमध्ये जहाजावरील हल्ल्यात भारतीय चीफ ऑफिसर सागर गुप्ता यांचा मृत्यू
भारताने ब्लॅक सीमध्ये एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात भारतीय खलाशाच्या मृत्यूच्या प्रकरणी युक्रेनचे राजदूत डॉ. ओलेक्सांद्र पोलिशचुक यांना बोलावले आहे. भारतीय खलाशांच्या संघटनांनी हल्ल्यासाठी युक्रेनियन ड्रोनला जबाबदार धरले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा युक्रेनसमोर प्रभावीपणे मांडला आहे.