Ajit Pawar ; तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे; ‘तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे’ या वक्तव्यावरून अजित पवारांची सारवासारव
माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत,” या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. “ते विधान मी ओघात बोललो होतो. तिजोरी माझ्या किंवा कुणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे. तसेच माझ्यापेक्षा जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच आहेत,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.