Chief Minister Yogi : ‘महाकुंभाला मृत्युकुंभ म्हणणारे होळीच्यावेळी दंगली रोखण्यात अपयशी ठरले’,
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या “मृत्यु कुंभ” विधानावर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “होळीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवू न शकलेल्यांनी प्रयागराजच्या महाकुंभाला ‘मृत्यु कुंभ’ म्हटले होते.”