Chief Minister Sarma : …अन् संतप्त मुख्यमंत्री सरमांनी दिले दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश!
आसाममधील धुबरी जिल्ह्यात अलिकडेच झालेल्या जातीय तणावानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सांगितले की, यावेळी बकरी ईदच्या दिवशी धुबरीच्या हनुमान मंदिरात गोमांस फेकून काही समाजकंटकांनी घृणास्पद आणि निंदनीय गुन्हा केला आहे. आमच्या मंदिरांना नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने एक विशिष्ट वर्ग सक्रिय झाला आहे, म्हणून आम्ही पोलिसांना बेकायदेशीर कृत्य दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.