‘Chief Minister Fadnavis : चांगल्या सुविधा चांगल्या कामाला प्रेरित करतात’ मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमवेत रविवारी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन केले. याप्रसंगी मान्यवरांनी वृक्षारोपण केले व माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील केले.