मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ
मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.