Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 17 नक्षली ठार; यात 11 महिला, कुख्यात कमांडरही मारला गेला
छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर शनिवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) आणि सीआरपीएफच्या ५००-६०० सैनिकांनी १७ नक्षलवाद्यांना ठार मारले. यामध्ये ११ महिला नक्षलवादी आहेत. केरळपल्ले पोलिस स्टेशन परिसरातील उपमपल्ली येथे ही चकमक झाली.