• Download App
    Chhatrapati Shivaji Maharaj Raigad | The Focus India

    Chhatrapati Shivaji Maharaj Raigad

    Raj Thackeray : मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण, राज ठाकरे रायगडावर; हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात आणण्याचा संकल्प

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळीच रायगडावर पोहोचलेत. ते तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. हे कुटुंब सकाळी 8 च्या सुमारास रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून ते रोप वेच्या माध्यमातून गडावर पोहोचले. राज ठाकरे छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर मनसेच्या सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला सुरुवातही करणार आहेत. ही नोंदणी उद्यापासून राज्यभर सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात यावा, अशी कामना राज यांनी व्यक्त केली आहे.

    Read more