Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा का नाही? जलील यांचा सवाल, तलवार नाचलवल्याचा आरोप
महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गुन्हा का दाखवण्यात आला नाही? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.