Chhagan Bhujbal : लाडकी बहीण योजनेचा मोठा आर्थिक भार; यंदाच्या गणेशोत्सवात ‘आनंदाचा शिधा’ नाहीच! छगन भुजबळ यांची माहिती
राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना गणेशोत्सव, दिवाळी, आणि इतर सणांमध्ये मिळणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेला यंदा ब्रेक लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे आनंदाचा शिधा पुरवणे यंदा शक्य होणार नाही.