ChatGPT : अर्थ मंत्रालयात चॅटजीपीटी व डीपसीकच्या वापरावर बंदी; मंत्रालयाचा कर्मचाऱ्यांना आदेश
भारताच्या अर्थ मंत्रालयाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कार्यालयीन कामासाठी ChatGPT आणि DeepSeek सारख्या AI साधनांचा वापर टाळण्यास सांगितले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की अशा AI टूल्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो.