Maharashtra : मंदिर-धर्मादाय संस्था आता म्युच्युअल फंड, ETF, कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये 50% निधी गुंतवू शकणार, राज्य सरकारची परवानगी
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक ट्रस्टसाठी मोठी आर्थिक क्रांती घडवणारा निर्णय नुकताच घेतला गेला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, आता सार्वजनिक ट्रस्ट त्यांच्या निधीपैकी 50 % पर्यंत रक्कम म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि इतर सध्याच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवू शकतात.