Chardham Yatra : चारधाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित; जाणून घ्या, नेमकं काय कारण?
चारधाम यात्रा रद्द करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंडमध्ये यात्रा सुरू होती, जी आता रद्द करण्यात आली आहे. गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे म्हणजेच रद्द करण्यात आली आहे. हरिद्वारमध्येच भाविकांना थांबविण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आले आहेत.