Chandrashekhar Bawankule : बोगस कुणबी प्रमाणपत्र काढल्यास कारवाई, चंद्रशेखर बावनकुळे यांची ओबीसी नेत्यांना मोर्चा रद्द करण्याची विनंती
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याने खोटे प्रमाणपत्र जारी केले किंवा दाखला तयार केला, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन ओबीसी संघटनांना त्यांचा 10 तारखेचा प्रस्तावित मोर्चा रद्द करण्याचेही आवाहन केले.