Chandigarh : चंदीगड बॉम्बस्फोट प्रकरणी पाकिस्तानी ग्रेनेडचा वापर!
गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी चंदीगडमधील सेक्टर दहा मधील एका बंगल्यात झालेल्या हँडग्रेनेड स्फोटाच्या प्रकरणात एनआयएने अनेक मोठे खुलासे केले आहेत. एनआयएने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, त्यावेळी घरात झालेल्या स्फोटासाठी वापरण्यात आलेला हातबॉम्ब पाकिस्तानमध्ये बनवण्यात आला होता.