Sadavarte : सदावर्तेंचा हल्लाबोल- मराठा आरक्षणाचा जीआर म्हणजे व्हायरस, कॅबिनेट बैठकीत शासन निर्णय मागे घ्यावा!
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली. मनोज जरांगे यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यानंतर आता या जीआरवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील पत्रकार परिषद घेत हा जीआर म्हणजे व्हायरस असल्याची टीका केली आहे.