central government : जेंडर बजेटमध्ये यावर्षी केंद्र सरकारने केली 37.5 टक्क्यांनी वाढ, 4.49 लाख कोटी रुपयांची तरतूद
1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या वर्षासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्रालयाने रविवारी सांगितले की, यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद वाढवण्यात आली आहे. यावेळी ४.४९ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तरतूदीपेक्षा ३७.५ टक्के जास्त आहे.