Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य
केंद्र सरकार नोकरीसाठी परदेशात जाण्याचे नियम अधिक कडक करत आहे. परराष्ट्र मंत्रालय एक नवीन कायदा करत आहे. विधेयकाचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल. जनता आणि तज्ज्ञांचे मत घेतल्यानंतर ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केले जाईल. अमेरिकेत बेकायदेशीरपणे गेलेल्या भारतीयांना हद्दपार केल्यानंतर ही प्रक्रिया वेगवान झाली आहे.