maharashtra: महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर; गृहमंत्रालयाकडून कर्नाटक राज्यालाही 384 कोटींची मदत जाहीर
मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरसंकटाचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने १५६६.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत केंद्राची ही दुसऱ्या टप्प्यातील मदत आहे. अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांची तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात हा निधी दिलासा देणारा ठरणार आहे.