PM Modi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा; PM मोदी RSSवर टपाल तिकीट आणि नाणे जारी करणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी समारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानावर प्रकाश टाकणारे एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील. हा कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होईल.