Census 2027 : जनगणना 2027: 29 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिला टप्पा पूर्ण; तमिळनाडू आणि त्रिपुरामध्ये सेल्फ-एन्यूमरेशन सुरू
भारताच्या 2027 च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम देशातील 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झाले आहे. तर, शुक्रवारपासून तामिळनाडू आणि त्रिपुरामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हाऊसलिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस (HLO) साठी ऑनलाइन सेल्फ-एन्यूमरेशन म्हणजेच सेल्फ रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.