PM Modi : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या 2 वर्षांनंतर पंतप्रधानांचा दौरा; चुराचंदपूरमधील मदत शिबिरात पोहोचले, इम्फाळमधील हिंसाचार पीडितांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. मे २०२३ मध्ये राज्यात हिंसाचार उसळल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधानांनी इम्फाळ आणि चुराचंदपूरमध्ये ८,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले.