NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक; ‘बायोलॉजी’चे प्रश्न फोडल्याचा आरोप
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी 2026’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा यंत्रणेतील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.