CBI and UK : सीबीआय आणि यूके क्राइम एजन्सीमध्ये सामंजस्य करार, आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणाला मिळणार गती
भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि यूकेच्या नॅशनल क्राइम एजन्सी (NCA) यांच्यात गुरुवारी ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) झाला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्ह्यांविरोधातील कारवाईला अधिक बळ मिळणार आहे. या कराराचा उद्देश सीमापारचे आर्थिक फसवणुकीचे तपास, भ्रष्टाचारविरोधातील सहकार्य, मालमत्ता जप्ती आणि आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यर्पण या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये अधिक परिणामकारक समन्वय साधणे हा आहे.