Dhananjay Munde : एका व्यक्तीने जाती-जातीत भांडणे लावली:माणसात माणूस राहिला नाही, महाएल्गार सभेतून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केले.