Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले- अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येत नाही
ओबीसी समाजातल्या ताटातले आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मात्र, दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील. पुरावे द्यावे लागतील, अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या इशाऱ्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.