Caste census posters : जातीय जनगणनेचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांमध्ये स्पर्धा, दिल्लीपासून बिहारपर्यंत पोस्टर वॉर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. मोदी मंत्रिमंडळाने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात ९४ वर्षांनंतर जातीय जनगणना होणार आहे. २०११ च्या जनगणनेत जातींची गणना करण्यात आली होती परंतु त्याची माहिती कधीही उघड करण्यात आली नाही.