UPI : UPI व्यवहारांमुळे भाजी विक्रेत्याला 29 लाखांची GST नोटीस; छोटे व्यापारी घाबरले, रोख व्यवहारांकडे वळण्यास सुरुवात
कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील एका भाजी विक्रेत्याला केवळ UPI व्यवहारांमुळे 29 लाख रुपयांची GST नोटीस पाठवण्यात आली आहे. शंकरगौडा नावाचे हे विक्रेते गेली चार वर्षे भाजीपाल्याचं दुकान चालवत असून, त्यांनी या काळात एकूण 1.63 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले. हे व्यवहार पाहून GST विभागाने त्यांच्याकडून कराची मागणी केली.