Justice Verma : जस्टिस वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू; सरकार- विरोधी पक्षातील 215 खासदार एकत्र
कॅश घोटाळ्यात अडकलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जुलै रोजी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, त्यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या नोटिसा संसदेच्या दोन्ही सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या २१५ खासदारांच्या (लोकसभेत १५२ आणि राज्यसभेत ६३) स्वाक्षऱ्या आहेत.