Salman Khan : सलमान खानविरोधात गुन्हा दाखल; पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता कायदेशीर अडचणीत
पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे सलमान खान अडचणीत आला आहे. भाजप नेते आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे वकील इंदर मोहन सिंग हनी यांनी अभिनेत्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की सलमान खानने माउथ फ्रेशनर ब्रँडची जाहिरात अशा प्रकारे केली आहे की ज्यामुळे तरुणांची दिशाभूल होईल. या प्रकरणाची सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.