Supriya Sule : इंडिगोच्या गोंधळावर सुप्रिया सुळे संतप्त; प्रवाशांचा वेळ, पैसा वाया, जबाबदार कोण? एकाच कंपनीवर अवलंबून राहू नका
देशातील सर्वात मोठी विमानसेवा म्हणून ओळख असलेल्या इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुणेसह देशातील अनेक विमानतळांवर उड्डाणे रद्द, अवधीपेक्षा अधिक विलंब आणि प्रवाशांच्या तक्रारींचा भडिमार वाढला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इंडिगोवर कठोर कारवाई करावी आणि हा प्रकार कसा घडला, याची चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ही अपेक्षा कुणालाही नव्हती. यामागे जबाबदार कोण? याला उत्तर मिळालेच पाहिजे.