Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई
कॅनडातील सरे शहरातील प्रतिष्ठित लक्ष्मी नारायण मंदिराच्या भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा सरे येथे वार्षिक नगर कीर्तन आयोजित केले जाणार होते. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर स्प्रे पेंटने ‘खलिस्तान जिंदाबाद’ आणि ‘फ्री पंजाब’ यासह इतर प्रक्षोभक घोषणा लिहिलेल्या आढळल्या.