California : कॅलिफोर्नियात मंदिराची तोडफोड, हिंदूविरोधी आक्षेपार्ह घोषणा लिहिल्या, भारताकडून निषेध व्यक्त
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि त्यावर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या. ही घटना चिनो हिल्स परिसरात घडली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ‘मोदी-हिंदुस्तान मुर्दाबाद’ सारख्या घोषणा आणि पंतप्रधान मोदींसाठी अपशब्द वापरलेले दिसत आहेत.